
Akhil Ramesh Joshi
blogs from Mahad (Dist.Raigad)


आभाळभर ओलं... ह्रदयात खोल.. सर तुझीच.... बेभान वारा.. देहभान सारा.. सय तुझीच.. राहीलेला गारवा कुणी छेडी मारवा.. सल तुझीच.. - अखिल जोशी...
Posted on 17 June 2015 | 4:48 pm
Read postतू असताना "कळतो" पाऊस तू नसताना "छळतो" पाऊस निरोप घेऊन मागे वळता गालावर ओघळतो पाऊस थेंब झेलती फुले सुगंधी पानावर सळसळतो पाऊस दूर डोंगरावरी सयींच्या धबाधबा कोसळतो पाऊस चाल ऐकुनी चाहूल देतो पैंजणात घुटमळतो पाऊस तुझा रेशमी स्पर्श होऊनी क्षणामध्ये विरघळतो पाऊस तुला बिलगता वीज होऊनी माझ्यावर कोसळतो पाऊस...
Posted on 15 June 2015 | 2:07 pm
Read postनिळी निळाई आभाळी एक रंग तो सांभाळी, मेघ सावळे दाटून येता इंद्रधनु त्याच्या भाळी...
Posted on 7 June 2015 | 11:53 am
Read post